उकळी बु. येथील अमोल व्यवहारे राज्यस्तरीय दादासाहेब फाळके आयकॉन २०२४ पुरस्काराने सन्मानित!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे प्रतिनिधी
उकळी बुद्रुक दि.१६ जून ;
जिजाऊ गृह उद्योगचे संचालक , जिल्हाध्यक्ष प्रतिभा साहित्य संघ बुलढाणा श्री. अमोल मोतीराम व्यवहारे रा. उकळी बुद्रुक यांना अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या हस्ते नुकताच पुण्याई सभागृह पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र दादासाहेब फाळके आयकॉन २०२४ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अमोल व्यवहारे यांनी ग्रामीण भागातील बेरोजगारांमध्ये उद्योजकीय मानसिकता परिवर्तन व्हावे या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करुन विविध कार्यशाळा राबविल्या तसेच नेहरू युवा केंद्र बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले त्या माध्यमातून प्रेरणा घेऊन बऱ्याच बेरोजगार युवकांनी स्वतः स्वयंरोजगार उभारले. परिसरातील कित्येक युवकांनी आदर्श घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचं काम केलं .
रोटरी क्लब पुणे अध्यक्ष सारंग बालंखे यांचेकडून उद्योजक अमोल व्यवहारे यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची कलाजीवन बहुउद्देशिय संस्था, ढगा, ता. वरुड, जि. अमरावती मार्फत दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र दादासाहेब फाळके आयकॉन २०२४ या पुरस्कारासाठी निवड केली .
हा कार्यक्रम आर्टिस्ट डॉ. युवराज ठाकरे कलाजीवन संस्थेचे अध्यक्ष, समाजसेविका डॉ. नाईक मुंबई, अभिनेता दिग्दर्शक व लेखक पियुष विजय भोंडे सचिव कलाजीवन संस्था , सौम्या पठाण बिग बॉस फॅशन डिझायनर , डिस्टिक गव्हर्नर मंजू फडके , ॲड. महात्मे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
उद्योजक अमोल व्यवहारे यांनी स्वकर्तृत्वाने प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांना दादासाहेब फाळके आयकॉन २०२४ हा पुरस्कार बहाल करण्यात आला.
दादासाहेब फाळके आयकॉन २०२४ हा पुरस्कार प्राप्तीनंतर उपस्थित असंख्य उद्योगपतींनी अमोल व्यवहारे यांना शुभेच्छा दिल्या. हल्ली पंचक्रोशीतुन अमोल व्यवहारे यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



