आ.सौ. श्वेता महाले यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवेचा अखंड यज्ञ…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली…….. प्रतिनिधी
आरुना दत्तात्रय खंडागळे
माता रेणुका चरणी प्रार्थना,दरग्यावर चादर आणी चिखली ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न…
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जनसेवेचा अखंड यज्ञ सुरू असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले.
सध्या त्या केरळ येथे असल्या तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली ग्रामीण रुग्णालयात भव्य महाआरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरामध्ये गरजू रुग्णांसाठी मोफत तपासणी, औषधोपचार तसेच आवश्यक त्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याच निमित्ताने चिखलीतील रेणुका माता मंदिर येथे माता रेणुका आईला पातळ अर्पण करण्यात आले, तर खैरूला शहा बाबा दर्गा येथे चादर चढवून सर्वधर्मीय सलोख्याचा संदेश देण्यात आला.
आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात असेच विकासकामे आणि समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जावेत, अशी भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली…
यावेळी श्री. विद्याधरजी महाले (मा. मुख्यमंत्री महोदयांचे खासगी सचिव), श्री. अंकुशराव पाटील, नगराध्यक्ष श्री. पंडितराव देशमुख, श्री. दत्ता सुसर, श्रीमती वैशालीताई खेडेकर, श्री. कपिलदादा खेडेकर, श्री. विनोद चव्हाण, शेख अनिस, श्री. सागर पुरोहित हे हजर होते तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य कर्मचारी व सर्व डॉक्टर हजर होते.



