जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दिल्लीच्या जंतर-मंतरच्या लढ्याला छत्रपती संभाजीनगरची हाक; केंद्र सरकारविरोधात ASP चे आक्रमक आंदोलन…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

छत्रपती संभाजीनगर:- २१ जुलै २०२६
सोनम वांगचुक व अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देशभरात शिक्षण, लोकशाही आणि नागरी हक्कांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या संघर्षाला पाठिंबा देत आजाद समाज पार्टी (कांशीराम) व नागरी मूलभूत हक्क अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत केंद्र सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे काही काळ परिसर घोषणांनी दणाणून गेला.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सोनम वांगचुक व अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारने विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. “शिक्षण व संविधान वाचवा”, “लोकशाहीचा आवाज दाबू नका”, अशा घोषणांनी क्रांती चौक परिसर दुमदुमून गेला. यावेळी बोलताना अरविंद कांबळे यांनी सांगितले की, देशातील युवक, विद्यार्थी आणि वंचित समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांचा आदर करण्याऐवजी त्यांना दडपण्याचा प्रयत्न होत आहे. ही भूमिका लोकशाहीसाठी घातक असून सरकारने तात्काळ संवाद साधून प्रश्न सोडवावेत, अशी मागणी त्यांनी केली. “दिल्लीत पेटलेला संघर्ष आता मराठवाड्यातही घुमू लागला न्याय, शिक्षण आणि संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आवाज अधिक बुलंद होत आहे……✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button