महाराष्ट्रविदर्भ

आळस नारोडवरील राहते पटवारी कॉलनी खाली जागावर अचानक लागली आग

आळस नारोडवरील राहते पटवारी कॉलनी खाली जागावर अचानक लागली आग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव

प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगांव – अळसणा रोड वरील राहत्या पटवारी कॉलनी नागरिकवस्तीत असलेल्या खाली जागेवर अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती. ही घटना आज दुपारी दोन वाजताचे दरम्यान घडली. खाली जागेवर गवत,झाडे झुडपी होती. तिथेच शेजारील नागरीक कधी कधी कचरा, सुद्धा टाकत असतात. तिथेच आज अचानक आग सुरू झाल्याने काही वेळात आगीने रूद्र रूप धारण केली. खाली असलेल्या जागेला लागुनच नागरीकांचे घरे आहेत. त्यामुळे नागरीक घाबरले होते. आग लागली असल्याचे कळताच शेजारचे नागरीकांनी एकत्र येत आग विझवु लागले. नागरीकांनी शेगांव शहरात नगरपालिका येथिल अग्निशामक दलाला फोन केले असता येथिल अग्निशामक दलाची गाडी येऊन आाग विझविण्यासाठी प्रयत्न केले. माजी नगरसेवक दिनेश शिंदे शेजारील नागरीक आणि मुल, शेगांव येथिल अग्निशामन दलाचे कर्मचारी व पटवारी कॉलनी नागरिक दिनेश गायकी,स्वराज झाडोकार,कृष्णा फाटक ,विश्वजीत कडुकर, उद्धव बावस्कार ,वैभव बावस्कार, प्रशांत नांदोकार,यावेळी आग विझविण्यात प्रयत्न केले. अखेर तास चाललेल्या या प्रयत्नाला यश आले, आग आटोक्यात आली. या घटनेत कुठलीही हानी झाली नसुन मोठा अनर्थ मूल शहरात असलेल्या मालकीच्या खाली, जागा किंवा प्लॉट जागेच्या मालकाने कुंपण करून, स्वच्छ ठेवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button