आमच्या पदाधिकाऱ्यांनाही पोलीस संरक्षण द्या…

आमच्या पदाधिकाऱ्यांनाही पोलीस संरक्षण द्या…
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ठाण्यात नगरसेवकांच्या स्वीय सहाय्यकाला पोलिस संरक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे आमच्या पक्षातील ५० पदाधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आमचे पदाधिकारी सुद्धा आंदोलने करीत असून त्याचबरोबर विरोधाची भुमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांनाही पोलीस संरक्षण देण्यात यावे, असे चव्हाण यांनी सांगितले. मुंबईच्या हद्दीत जाताना टोल माफ करण्यासाठी यापूर्वी मुख्यमंत्र्यांनीही यापुर्वी आंदोलन केले होते, परंतु अद्यापही टोलमाफी झालेली नाही. त्यामुळे किमान ठाणेकरांसाठी तरी ही टोलमाफी मिळावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.



