बुलढाणामहाराष्ट्र

जास्तगाव येथील कु. संजना जगन्नाथ गव्हांदे यशाची शिखरे सर! पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- ८ एप्रिल २०२६
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अकॅडमी, वरवट बकालचा अभिमान कुटुंबासह गावात आनंदाचे वातावरण
जास्तगाव येथील कु. संजना गजग्राथ गव्हांदे हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. पहिल्याच प्रयत्नात तिने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल (पुणे शहर) या पदावर निवड मिळवून आपल्या कुटुंबाचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.संजना हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अभ्यासावर लक्ष केंद्रित ठेवत कठोर परिश्रम केले. तिच्या या यशामागे तिची जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास महत्त्वाचा ठरला.
तिने स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अकॅडमी, वरवट बकाल येथे मार्गदर्शन घेतले. अकॅडमीतील शिक्षकांनी योग्य दिशा व मार्गदर्शन दिल्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे संजना हिने सांगितले.
तिच्या यशामुळे संपूर्ण जतगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.संजना गव्हांदे हिचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून “मेहनत केली तर यश नक्की मिळते” याचे उत्तम उदाहरण ठरले आहे.कु. संजना गव्हांदे हिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, भविष्यात ती आणखी मोठे यश मिळवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button