स्व. बंडू लहाने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कीर्तन सोहळ्याचे आयोजन.

हिवरखेड: आकांक्षा टायपिंग अँड कम्प्युटर इन्स्टिटयूटचे प्राचार्य व डॉ. मयूर बंडु लहाने यांचे वडील, स्व. बंडू पंजाबराव लहाने यांची दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी देवाज्ञा झाली यांच्या अकरावा दिवस दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी (शुद्धपंगत) निमित्त एका भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा इन्स्टिट्यूटच्या सर्व आजी-माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित केला जात आहे.
या कीर्तन सोहळ्यासाठी बाल कीर्तनकार ह.भ.प. कृष्णा महाराज सदाफळे (अध्यक्ष, आजी-माजी विद्यार्थी संघटना हिवरखेड) हे उपस्थित राहून कीर्तन सादर करणार आहेत. त्यांच्या वाणीतून अध्यात्मिक विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम ९ ऑक्टोबर, २०२५ रोजी, गुरुवारी सकाळी ९ वाजता सुरू होईल. इन्स्टिट्यूटच्या सर्व विद्यार्थी आणि परिसरातील भाविकांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकांक्षा टायपिंग अँड कॉम्पुटर इन्स्टिट्यूट हिवरखेड च्या सर्व विध्यार्थी व विद्यार्थिनी तसेच आयोजकांनी केले आहे. हे कीर्तन स्व. बंडू पंजाबराव लहाने यांना विद्यार्थ्यांकडून एक विनम्र आदरांजली म्हणून आयोजित करण्यात आले आहे.



