शेलोडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगांव
खामगाव तालुक्यातील शेलोडी येथील शेत शिवारातील टिन शेडच्या जागेमध्ये सुरू असलेल्या एक्का बादशाह नावाचा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ५ जणांना पकडले. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोहेका कैलास चव्हाण
यांनी पथकासह तालुक्यातील शेलोडी येथील शेत शिवारात टिन शेडच्या जागेमध्ये सुरू असलेल्या एक्का बादशाह नावाचा जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता १) मंगेश भाष्कर सिरसाठ (३३) रा.सावंगी ता. बाळापुर २) आकाश गजानन सराटे (२१) रा. फुले नगर माळी पुरा शेगाव ३) आकाश विलास वानखडे (२४) रा. मोदी नगर शेगांव
४) प्रशांत जगन्नाथ लांबे
(२४) रा. भोईपुरा शेगांव ५)
गोपाल सुधाकर शेगोकार (४१)
रा. इंदिरा नगर रेल्वे गेट शेगाव यांना
जुगार खेळताना रंगेहाथ पकडले
व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी
नगदी ५२ ताशपत्ते दोन मोबाईल
असा एकूण ६४१५ रुपयाचा जुगार
मुद्देमाल जप्त करून खामगाव ग्रामीण
पोलिसांनी या पाच जणांविरुद्ध
कलम १२ अ मजुका नुसार गुन्हा
दाखल केला आहे



