देऊळगाव राजा येथे विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस उत्साहात साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
दिनांक 13/9/26 रोजी देऊळगाव राजा प्रखंड येथे विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस साजरा करण्यात आला.विश्व हिंदू परिषदेची स्थापना गोकुळाष्टमी या दिवशी करण्यात आली होती त्या अनुषंगाने स्थापना दिवस साजरा करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. श्री उगले महाराज होते तर प्रमुख वक्ते म्हणून कु आकांक्षा वर्मा दुर्गा वाहिनी विदर्भ प्रांत संयोजिका, श्री माधव धुंदाळे जिल्हा मंत्री विश्व हिंदु परिषद, जिल्हा अध्यक्ष श्री मनिषजी काबरा विश्व हिंदू परिषद बुलडाणा, जिल्हा सह संयोजक कु. प्रज्ञा गुळस्कर, जिल्हा सह संयोजक श्री संभाजी शिंगणे तसेच प्रखंड अध्यक्ष श्री सुनिल धोंडरकर हे मंचावर उपस्थित होते, या कार्यक्रमास स्थानिक बांधवांची उपस्थिती लक्षणीय प्रमाणात होती. कु आकांक्षा वर्मा यांनी आपल्या प्रमुख वक्ता यांनी आपल्या भाषणात जिच्या होती पाळण्याची दोरी ती जगाला तारी असे सांगून भारतीय महिलांची ओळख ही राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी ताराबाई यांचे मुळे आहे त्यांचे आदर्श ठेवून महिलांनी आचरण केले पाहिजे असे सांगितले. विश्व हिंदू परिषद जे सांगते ते करते हे आता राममंदिर बांधले यावरून सर्वांना समजले आहे. धर्मांतर करू नये याबाबत कळकळीने जनतेला संबोधित केले. शेवटी श्री मनिष जी काबरा यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली, या कार्यक्रमाचे संचालन श्री सुनिल धोंडरकर यांनी केले.



