.श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानाचे फलित म्हणजे आज काश्मीर भारताचा

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानाचे फलित म्हणजे आज काश्मीर भारताचा अविभाज्य घटक– आ अँड फुंडकर स्टार भारत लाइव एक्सप्रेस ऋषिकेश देठे स्व श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनी भाजपच्या वतीने श्रद्धांजली खामगाव –;- शहीद श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदानाचे फलित म्हणजे आज जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ अँड आकाश फुंडकर यांनी केले. अखंड भारत व काश्मीर साठी शाहिद झालेले भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिनानिमित्त त्यांना भाजपच्या वतीने श्रद्धांजली देण्यात आली, त्यावेळी आ अँड फुंडकर बोलत होते. सर्वप्रथम आ अँड फुंडकर यांनी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे जीवनावर प्रकाश टाकला, यावेळी पुढे बोलताना आ अँड फुंडकर म्हणाले की,”काश्मीर भारतात असूनही तो वेगळा आहे, तेथे वेगळा ध्वज का, म्हणून “एक देश एक निशाण !” ही घोषणा देऊन त्यांनी काश्मीर मध्ये आंदोलन केले. आणि त्याच वेळी त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. काश्मीर साठी त्यांनी खूप मोठे बलिदान दिले. आज देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे आज काश्मीर मधून कलम 370 हटले, आणि आता काश्मीर मध्ये सुद्धा भारताचा तिरंगा ध्वज फडकवित आहे, त्यांचे बलिदान हिंदुस्तान कधीच विसरू शकत नाही. त्यांचे विचारानेच जनसंघ नंतर निर्माण झालेली भाजपा काम करत आहे असे प्रतिपादन आ अँड फुंडकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एकनाथ पाटील यांनी केले. याप्रसंगी भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, शांताराम बोधे, भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, जितेंद्र पुरोहित, देवेशजी भगत, संतोष टाले, संतोष हागारे, संदीप राजपूत, रवी गायगोळ, यांचेसह भाजप पदाधिकारी व कार्यक्रन्यांनीही डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केले.



