श्री गणेश विद्यामंदिर शाळेत २१ जून योगदिवस म्हणून साजरा करण्यात आला .दिवा

श्री गणेश विद्यामंदिर शाळेत २१ जून योगदिवस म्हणून साजरा करण्यात आला .दिवा – (सचिन शेलवले ) शिवदत्त ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री गणेश विघा मंदिर या शाळेत प्राथमिक विभाग इयत्ता १ ली ते ३ री च्या विद्यार्थ्यानी २१ जुन २023 रोजी योगदिन म्हणुन साजरा केला . सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शिवकांनी योगाचे महत्व व त्याचे फायदे समजावून सांगितले . जीवनामध्ये आनंद मिळविण्यासाठी आपले आरोग्य आणि मानसिक संतुलन किती महत्वाचे आहे . हे समजावून सांगितले . श्री सचिन पाटील व श्री सचिन शेलवले सर यांनी मुलांना अनेक योगाचे प्रकार प्रात्यक्षिक करून दाखविले . सर्व विद्यार्थांनी उत्साहाने शिक्षकांसोबत योगाचे प्रकार केले . आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणताही आजार होऊ नये म्हणुन दररोज योगा करणे आवश्यक आहे . धन , संपत्ती, श्रीमंती पेक्षा शारिरीक आरोग्य किती महत्वाचे हे मुलांना समजावून सांगितले . योगा कार्यक्रम साध्य करण्यासाठी विदयार्थांसोबत प्राथमिक विभागाचे सौ . नलिनी मॅडम, सौ . प्रेरणा जाधव मॅडम, सौ . मिरा इरनक मॅडम, सौ .माधवी शिंदे मॅडम तसेच जयश्री मुंडे मॅडम या शिक्षकांचा सुद्धा सहभाग होता . तसेच प . पूज्य श्री .माताजी निर्मला देवी सहज योग यांची पूर्ण टीम योगा शिकविण्यासाठी आली होती . त्यांनी मुलांना सोप्या पध्दतीने योगा शिकविला . मन शांत कसे ठेवायचे . शरीरातील हाडे कशी मजबुत राहतील यावर आधारीत योगा शिकविला .



