आंबेडकर चौकातील युवती बेपत्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
शेगाव । शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रहिवासी युवती बी.ए.परीक्षेचा पेपर देण्यासाठी जाते असे घरी सांगून गेल्यानंतर घरी परत आली नाही. युवतीच्या वडीलांनी शहर पो.स्टे. ला मुलगी हरविल्याची तक्रार दिली असून पोलिसांनी याप्रकरणी मिसींगची नोंद केली आहे.
या घटनेसंदर्भात फिर्यादी श्रीकीसन परशराम जवंजाळ (४६) रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शेगाव यांनी शहर पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी कु. आरती श्रीकीसन जवंजाळ वय १८ वर्षे ९ महिने ही बी.ए.चा पेपर मुरारका कॉलेज येथे आहे असे सांगून दुपारी १.३० वाजता सुमारास राहते घरून निघुन गेली. त्यानंतर संध्याकाळी फिर्यादी घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीने मुलगी आरती घरी आली नसल्याचे सांगितले. रात्री मुलीचा शोध तिचे मित्र मैत्रिणीकडे व नातेवाईकांकडे घेतला. मात्र ती मिळून आली नाही. करिता पो.स्टे.ला तिचा शोध घेणेकामी रिपोर्ट दिला आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या रिपोर्टवरून मिसींगची नोंद केली असून एएसआय गजानन गावंडे यांच्याकडे तपास सोपविला आहे



