
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
(संग्रामपूर): जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे थैमान झाले. संग्रामपूर तालुक्यातील गावांना याचा सर्वाधिक फटका बसला. दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वात आहात झालेल्या कुटुंबांना वन बुलढाणा मिशनच्या वतीने किराणा किटचे वितरण करण्यात आले. संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही घरांवरील टीनपत्रे उडाली तर काही घरात अवकाळीचे पाणी घुसल्याने घरातील जीवन आवश्यक वस्तूंचे नुकसान झाले. वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने किराणा किट वाटप करण्याच्या सूचना वन बुलढाणा मिशनच्या स्वयंसेवकांना दिल्या. वन बुलढाणा मिशनच्या टीमने एक लारा, बानोदा, धामणगाव, गोतमारे यासह परिसरातील गावांत पोहोचून गरजू कुटुंबीयांना किराणा किटचे वितरण केले.



