बुलढाणामहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसांस्कृतिक
जिल्हा परिषद केंद्रीय उच्च मराठी प्राथमिक शाळा वरवट खंडेराव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न!.…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा वरवट खंडेराव येथेछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फार मोठ्या उत्साहात पार पडली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंत भाऊ गाळकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका हरणे मॅडम आदरणीय वरवट खंडेराव शाळेचे केंद्रप्रमुख श्री दिनेश तायडे सर प्रमोद काळे सर चोपडे सरइत्यादी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काळे सर यांनी करून प्रास्ताविक पर भाषण सुद्धा काळे सर यांनी केले आपल्या प्रस्ताविक भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या रयतेवरील प्रेम आणि आपल्या रयतेसाठी केलेल्या कार्याचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केला .तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका हरणे मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वसंता भाऊ गाळकर,शाळेचे केंद्रप्रमुख दिनेश तायडे सर ,चोपडे सर यांनी सुद्धा आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी गायली.तसेच कार्यक्रमांमध्ये बरेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी दिनेश तायडे सर यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.



