बुलढाणामहाराष्ट्रविदर्भशैक्षणिक

बारावीची परीक्षा देण्यासाठी गेलेली तरुणी बेपत्ता.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी : प्रशांत चव्हाण

चिखली : दि.१७ तालुक्यातील कव्हळा येथील एक १८ वर्षीय तरुणी बारावीचा पेपर देण्यासाठी जाते. असे सांगून घरातून निघाली. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला पण काहीच पत्ता न लागल्याने अखेर चिखली पोलीस स्टेशन येथे हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कव्हळा येथील रहिवासी संजय विठ्ठल साठे (वय ४५ वर्ष ) यांची मुलगी कु.साधना संजय साठे (वय १८ वर्ष ) ही बारावीची विद्यार्थिनी असून तिची सध्या परीक्षा सुरू आहे. दि.१० फेब्रुवारी २६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास साधना ही अमडापूर येथील महाविद्यालयात पेपर देण्यासाठी जात आहे असे सांगून घरातून निघाली,
रात्र झाली तरी ती घरी परतली नाही तिच्या घरच्यांनी नातेवाईकांनी मित्र-मैत्रिणी यांनी तिचा सगळीकडे शोध घेतला , मात्र साधना कुठेही सापडली नाही अखेर तिचे वडील संजय साठे यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिली, पोलिसांनी मिसिंग दाखल करून शोध मोहीम सुरू केली असून पुढील तपास अंमलदार भगवान शेवाळे हे करीत आहेत. वर्णन- रंग गोरा , उंची साधारण ५ फूट , शरीर बांधा मजबूत, केस लांब अंगात पांढऱ्या रंगाचा टॉप व ल्यागिज , त्यावर भगव्या रंगाची ओढणी आणि पायात लाल रंगाची सॅंडल घातली आहे. दरम्यान या वर्णनाची युवती कुठेही आढळून आल्यास चिखली पोलीस स्टेशनची संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button