अन् अशाप्रकारे बुलढाण्याला आले राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कृषी महाविद्यालय!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
आवाज न्यायाचा चिखली तालुका प्रतिनिधी अरुणा दत्तात्रय खंडागळे
विद्याधर महाले यांनी मांडली जिल्ह्याची गरज अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तत्काळ सकारात्मक भूमिका..
अल्पविकसित असलेल्या बुलढाणा जिल्ह्याला एकाचवेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालय कसे काय मिळाले, याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, श्री. विद्याधर महाले यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात या दोन्ही महाविद्यालयांच्या मंजुरीमागील नेमका प्रसंग समोर आला.
या प्रसंगाचा उल्लेख करताना श्री. विद्याधर महाले यांनी सांगितले की, राज्यात एकाचवेळी ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बुलढाणा जिल्ह्याचा विषय मांडला.
‘साहेब, बुलढाणा जिल्ह्यातदेखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही,’ असे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत, ‘हो हो… राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मिळालेच पाहिजे,’ असे उद्गार काढले.
मुख्यमंत्र्यांनी बुलढाणा जिल्ह्याची ही गरज तत्काळ मान्य केली आणि त्यानंतर बुलढाण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याचा निर्णय मार्गी लागला, असे श्री. विद्याधर महाले यांनी सांगितले.
चर्चेदरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी शिक्षणाची गरजही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्ह्यात कृषी महाविद्यालयाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
श्री. विद्याधर महाले यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात या प्रसंगाचा उल्लेख होताच उपस्थितांमध्येही याची विशेष चर्चा रंगली. ‘साहेब, बुलढाणा जिल्ह्यात मेडिकल कॉलेज नाही’ या एका वाक्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मिळालेच पाहिजे’ असे दिलेले उत्तर आणि त्यानंतर मार्गी लागलेला बुलढाण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय हा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे…✍️



