अन्न सुरक्षा पथकाच्या छाप्यात अंदाजे ५५ ते ६० हजार चा गुटखा पान मसाला जप्त,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :- प्रशांत चव्हाण
देऊळगाव मही :- (दि.15जून)अन्न व औषध प्रशासन अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार राज्यात विविध ठिकाणी त्यांचे पथक अमली पदार्थ व भेसळ वर धडक कारवाईचा सुसाट सुरू आहे, त्याच अनुषंगाने
देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे
किराणा दुकानातून ६० हजार रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला
सदर एक आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली अन्न व औषधी प्रशासन अधिकारी च्या मार्गदर्शन खाली सदर आरोपी तोफिक खान सलीम खान राहणार देऊळगाव मही दुसरा आरोपी इकबाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे , त्याच्यात
तौफिक खान याला अटक करण्यात आली
या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस स्टेशनचे ठाणेदार ब्रह्मगिरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
सूत्राच्या माहितीनुसार FDA पथकांना गुप्त माहितीनुसार अचानकपणे त्यांनी देऊळगाव मही येथील किराणा स्टोअर वर जाऊन प्रकरणाची सापळा रचून त्यांनी गोदाम मधी असलेले गुटखा तंबाखू जप्त केला
सध्या आयुक्त तुकाराम मुंढे साहेब FDA पथक यांच्या मार्गदर्शनाखाली
बेधडक जे कारवाई सुरू आहे सर्व व्यापाऱ्यांचे तारामुळ उडालेली आहे कधी कोणावर कारवाई होईल याचा नेम नाही त्याच्यामुळे भेसळ करणाऱ्या व्यापारी च चिंता वाढलेली आहे.
ठाणेदार ब्रह्मगिरी साहेब यांनी खडक चेतावणी दिलेली आहे लोकांच्या आरोग्याची खेळत असेल तर कोणालाही सोडणार नाही. असे कडक आदेश देण्यात आलेले आहे
दुसरीकडे देऊळगाव राजा शहरात अन्न व औषधी अधिकारी तुकाराम मुंढे यांचा धाडस वाढलेला आहे,
अन्न व औषधी सुरक्षा अधिकाऱ्यांनी छापा टाकून प्रसार माध्यमशी बोलताना सांगितले की भेसळ करणाऱ्याला कोणालाही सोडणार नाही अशाप्रकारे किराणा दुकान व दूध डेरी छोट्या मोठ्या व्यापारी यांच्यावर भीतीच वातावरण निर्माण झालेली आहे या कारवाईमुळे.
तसेच सामान्य जनतेकडून या कारवाईमुळे FDA पथकाचा कौतुक होत आहे.



