बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
जन्म मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांना हेलपाटे? विद्यार्थ्यांचे प्रवेश, वारस नोंदी आणि शासकीय कामे रखडली सीआरएस पोर्टल बंद _संथ!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
संग्रामपूर, दि.१३/७/२६ सविस्तर वृत्त असे की केंद्र सरकारच्या नागरी नोंदणी प्रणाली सीआरएस च्या नवीन पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने राज्यभरात जन्म व मृत्यू नोंदणीचे प्रक्रिया संत झाली असून अनेक ठिकाणी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याची स्थिती आहे. यामुळे ग्रामपंचायत स्तरावर जन्म व मृत्यू दाखले वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सीआरएस ही केंद्र सरकारची अधिकृत जन्म मृत्यू नोंदणी प्रणाली आहे.
सध्या शाळांमध्ये पहिली इयत्तेच्या परीक्षेची प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशासाठी जन्म दाखला अनिवार्य असल्याने अनेक पालक ग्रामपंचायत व संबंधित कार्यालयाचे उंबरठ्याचे झिजवत आहेत. मात्र पोर्टल सुरू नसल्यामुळे किंवा अत्यंत संत गतीने चालत असल्यामुळे दाखले मिळविण्यात अत्यंत विलंब होत आहे.
याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे निधनानंतर वारस नोंद, बँक खा, विमा, मालमत्ता हस्तांतरण तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मृत्यू दाखला अत्यंत आवश्यक असतो. परंतु मृत्यू दाखले वेळेत मिळत नसल्याने अनेक कुटुंबांचे महत्त्वाचे कामे खोळंबली आहेत. यापूर्वीही सीआरएस प्रणालीतील तांत्रिक विभागामुळे महाराष्ट्रात जन्म व मृत्यू दाखले देण्यास विलंब झाल्याच्या घटना समोर आलेल्या होत्या. राज्य व केंद्र शासनाने सीआरएस पोर्टल मधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून सेवा सुरळीत करावी ही विनंती आहे. या गंभीर समस्यांकडे संगमनेरचे आमदार अमोल खताळ साहेब यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे हे येथे उल्लेखनीय आहे.



