अंधश्रद्धेला कलाटणी देत समाजसुधारक गजानन हरणे यांनी घरातल्या खऱ्या लक्ष्मीचे पूजन करून त्यांना मान-सन्मान देऊन ,दर्शन घेत दिवाळी केली साजरी!स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी विजय घोडे

अकोला. दि. 2 नोव्हें. | अकोला स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी बु. अकोला येथील समाजसुधारक, समाजसेवक मराठायोद्धा , संयोजक निर्भय बनो जनआंदोलन, जिल्हा उपाध्यक्ष अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या दिवशी आपल्या घरातील खरा लक्ष्मी असलेल्या पत्नी यूगेश्वरी हरणे, , मुलगी कु.अवंती हरणे यांचे दिवाळीच्या दिवशी घरातील महिलांचे पूजन करून दर्शन घेतले आपल्या घरामध्ये असलेल्या महिलांचा मानसन्मान करून दिवाळीच्या दिवशी घरच्या खऱ्या लक्ष्मीची पूजा करून, तिचे दर्शन घेऊन दिवाळी साजरी केली .त्यामध्ये पत्नी अर्धांगिनी सौ यूगेश्वरी हरणे, मुलगी कू.अवंती हरणे त्यांचे पूजन ,दर्शन घेऊन , गोड पदार्थ खाऊ घालून आदर व्यक्त केला. व खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन साजरे केले. प्रत्येक वेळी आपल्या घरच्या महिलाच पुरुषाचे पूजन व दर्शन घेत असतात. परंतु या अंधश्रद्धेला कलाटनी देऊन आपण स्वतः आपल्या घरच्या महिलांचा सन्मान वाढवून त्यांना मानसन्मान देणे गरजेचे आहे. व त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करणे गरजेचे आहे. कागदी ,मातीच्या प्रतिमांची पूजन केल्यापेक्षा आपल्या घरामध्ये आपल्याला अहो रात्रंदिवस सांभाळणाऱ्या आपल्या प्रत्येक वेळी अडचणीमध्ये आपली साथ देणाऱ्या संपूर्ण परिवार नातेगोते सांभाळून ठेवून त्याला एकत्रित गुंफण्याचे ,परिवारासाठी जीवनभर त्याग करणाऱ्या आपल्या घरातील आई-बहीण पत्नी ,वहिनी ,मुलगी आदी सर्व महिलांची, जिवंत गृहलक्ष्मीचे पूजन व आदर सन्मान ठेवून दिवाळीनिमित्त त्यांच्याप्रती आपण पुरुषांनी आपला पुरूशी अहंकार बाजूला ठेवून या महिलांचा सन्मान केल्यास खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन होईल आपल्या घरातील लक्ष्मी खुश असेल तर संपूर्ण कुटुंब परिवार खुश आनंदी राहील. आपल्या घरातील सर्व नियोजन करणाऱ्या घरातील लक्ष्मीचा त्यामध्ये आई ,पत्नी, बहीण, वहिनी, मुलगी, मैत्रीण यांचा योग्य सन्मान करणे म्हणजेच खरे लक्ष्मीपूजन होय. आथरून पाहून पाय पसरवणे म्हणजेच खरे लक्ष्मीपूजन होय. ज्यांनी गरजेच्या वेळेस आपल्याला आर्थिक मदत केली, आत्मिक बळ दिले त्यांचे आयुष्यभर आभारी राहणे हेच खरे लक्ष्मीपूजन होय. गजानन हरणे यांनी स्वतःच्या लग्नाच्या वर्षापासून हा पायंडा चालू केला असून त्याला आज 24 वर्षे पूर्ण झाली तसेच ही परंपरा कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. ”दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान “असे न करता स्वतःपासून परिवर्तनाची सुरुवात त्यांनी केली आहे. कृतिशील सामाजिक कार्यकर्ता म्हणून परीचीत असलेले गजानन हरणे हे दरवर्षी दिवाळीच्या दिवशी आपल्या घरातील महिलांचे औक्षण करून त्यांचे दर्शन घेऊन गोड पदार्थ खाऊ घालून दिवाळी साजरी करीत असतात. आणि हीच परंपरा कायम ठेवून त्यांनी या वर्षी सुद्धा दिवाळीच्या दिवशी आपल्या घरातील महिलांची आनंदाची दिवाळी साजरी केली आहे. त्यांचा मान-सन्मान आदर वाढवण्यासाठी आपनही आपल्या कुटुंबातील महिलांना अशाप्रकारे मान-सन्मान देऊन त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करावी अशी विनंती , आवाहन समाजसुधारक, समाजसेवक मराठायोद्धा गजानन हरणे यांनी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस या वृत्तसंस्थेच्या प्रसिद्धी माध्यमा द्वारे समाजातील जागृत परिवर्तनवादी नागरिकांना केले आहे.



