बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अंढेरा जि.प. केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत दिमाखदार यश

१९ पैकी १० विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र; आराध्या दांडगेला ३०० पैकी २३६ गुण, शिक्षकांच्या परिश्रमाला पालकांची कौतुकाची थाप

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

देऊळगाव राजा, प्रतिनिधी शंकर शिवरकर

ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा उत्कृष्ट नमुना ठरलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, अंढेरा (ता. देऊळगाव राजा) येथील विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. परीक्षेला बसलेल्या १९ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १० विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून, शाळेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. या यशामुळे संपूर्ण अंढेरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट……
या परीक्षेत कु. आराध्या नंदकिशोर दांडगे हिने ३०० पैकी २३६ गुण (७८.६७ टक्के) मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेतील सर्वाधिक गुण मिळवून तिने शाळेचा तसेच गावाचा नावलौकिक वाढविला आहे.
शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी
कु. आराध्या नंदकिशोर दांडगे – २३६/३०० (७८.६७%)
निखिल राजू राऊत – ७४.६७%
कु. आराध्या अजय जाधव – ७३.३३%
अभिषेक अनंता सानप – ७३.३३%
ओम गणेश सानप – ७०.००%
कु. कोमल भगवान काकड – ६९.३३%
ओम शंकर घधरे – ६८.६७%
मोईन मोहसीन शाह – ६७.३३%
आदिनाथ गजानन महामुने – ६६.००%
कु. त्रिशा संजय बेल्टे – ५७.३३%

या यशामागे शिक्षकांचे नियोजनबद्ध अध्यापन, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थ्यांवर घेतलेले वैयक्तिक लक्ष आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांनीही मेहनत आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले.
या उल्लेखनीय निकालाबद्दल पालकांनी शाळेतील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदाचे मनापासून आभार मानत त्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते उत्कृष्ट यश मिळवू शकतात, हे अंढेरा येथील जिल्हा परिषद शाळेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button