अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आजपासून सप

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आजपासून सप
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव
प्रतिनिधी श्याम पहूरकरशेगाव अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन शासन पूर्ण करत नसल्याने नाईलाजाने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन संघटनेच्या वतीने २० फेब्रुवारी पासून संप पुकारण्यात आला आहे. याबाबत १७ फेब्रुवारी रोजी महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी शेगाव यांना आयटक संघटनेच्या स्थानिक तालुका पदाधिकारी व अंगणवाडी सेविकांनी निवेदन दिले..निवेदनात नमूद आहे की, – महाराष्ट्र राज्यात दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी असून अंगणवाडी सेविकांना दरमहा ८ हजार तीनशे ते ८ हजार पाचशे तर मदतनिसांना ४हजार दोनशे रुपये दरमहा मानधन दिले जाते.आयटक संघटनेचे सिडीपीओना निवेदनशासनाने मानधन वाढ, दरमहा पेन्शन आजाराची रजा, दर्जेदार मोबाईल, पोषण ट्रॅकर मराठीत इत्यादी प्रश्न सोडविण्याचे वेळोवेळी आश्वासन दिलेले आहे. शासनाने आश्वासन पूर्ण नकेल्यामुळे नाईलाजाने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने २० फेब्रुवारी पासून अंगणवाडी कर्मचान्यांच्या मागण्यांबाबत बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे.अंगणवाडी कृती समितीच्या वरील संघटना, घटक संघटना असल्यामुळे या बेमुदत संपात सहभागी आम्ही आहोत. तरी शासनाने योग्य दखल घेऊन व दिलेल्या आश्वासने पूर्ण करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भरघोस मानधन वाढ होईपर्यंत बेमुदत संप सुरू राहील. यात अंगणवाडी केंद्र आहारासहित बंद राहतील संप काळात संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती मागू नये. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर संघटनेच्या तालुकाध्यक्ष मालती भारद्वाज, तालुका सचिव राजश्री अहिर, माया वानखडे व तालुक्यातील इतर अंगणवाडी सेविकांच्या सह्या आहेत.



