महाराष्ट्र

धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्यावर कारवाई रुग्णसेवक उमेश इंगळे यांच्या मागणीला यश

*धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्यावर कारवाई रुग्णसेवक उमेश इंगळे यांच्या मागणीला यश

*अकोला प्रति – धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली असून रुग्णसेवक उमेश इंगळे यांच्या मागणीला यश आले आहे ७/०१/२०२३ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा अंतर्गत ग्राम चेलका गावातील गरोदर माता श्रीमती उषा मनोहर इंगळे यांना प्रसुती करीता प्राथमिक आरोग्य केंद्र धाबा येथे आणले असता त्या ठिकाणी गरोदर मातेला उपचार मिळाले नसल्याने परस्पर ग्रामीण रुग्णालय बार्शी टाकळी येथे घेऊन जावे लागले दरम्यान रुग्णवाहीकेतच महिलेची प्रसूती झाली व वेळेवर उपचार मिळून शकल्याने बाळाचा मृत्यू झाला या घटनेत जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्नसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर असोले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती त्यानुसार या घटनेची चौकशी करिता समिती गठीत करून सदर चौकशी अहवालानुसार दोषी आढळलेल्या डॉक्टर प्रतिभा डांगे वैद्यकीय अधिकारी, यांची एक वेतन कपात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे श्रीमती नंदा गायकवाड आरोग्य सेविका यांची सुद्धा एक वेतन वाटप करण्यात आली आहे व श्रीमती अनिता भोंडणे कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांचे पाच टक्के वेतन कपात करण्यात आले आहे परंतु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित देशमुख हे अनुपस्थित असल्यामुळे त्यांना चौकशीतून वगळण्यात आल्या असल्याकारणाने मृत बाळाचे वडील मनोहर इंगळे यांनी सदर तक्रार उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्याकडे केली असून ती तक्रार आरोग्य अधिकारी यांच्याकडे दिली व डॉक्टर अमित देशमुख यांची पुनश्च चौकशी करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अमित देशमुख यांच्या विरोधात पुन्हा चौकशी समिती गठित केली आहे यामुळे उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्नसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्या मागणीला यश आले असून पीडित मनोहर इंगळे यांनी त्यांचे आभार मानले आहेत व डॉ अमित देशमुख यांच्या वर जिल्हा आरोग्य अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button