शिवसेना बळकटतेच्या दिशेने मुक्ताईनगरातील पक्षप्रवेश

मुक्ताईनगर प्रतिनिधी :
मुक्ताईनगरच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. श्री. आप्पा नाईक, श्री. सचिन महाजन, श्री. दिपक नानोटे आणि श्री. बबलू मिस्तरी यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते मा.ना. एकनाथजी शिंदे यांच्या कार्यप्रणालीवर तसेच आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
या पक्षप्रवेशामुळे मुक्ताईनगर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक दृढ झाली असून स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्याला नवी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नव्या कार्यकर्त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख छोटुभाऊ भोई, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, बंटीभाऊ जैन, दिपक नाईक, देवानंद वंजारी, बाळू मिस्त्री, दिपक पठार, दीपक वाघ, गोलू कोळी, अंकुश बावणे, गौरव काळे, रोहित बावस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
👉 मुक्ताईनगर परिसरातील अलीकडच्या राजकीय घडामोडींमध्ये हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात असून स्थानिक राजकारणात आगामी काळात शिवसेनेचा प्रभाव अधिक वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. 🚩



