बुलढाणामहाराष्ट्र

बुलढाणा जिल्ह्यात ‘ट्रिगर-१’ अंतर्गत दुष्काळ जाहीर; माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मानले महायुती सरकारचे आभार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

सिंदखेडराजा:बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील दुष्काळी संकटाची भीषणता लक्षात घेऊन, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

खरीप हंगाम २०२६ साठी जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर आणि बुलढाणा या सर्व १३ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ अंतर्गत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आणि शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती लागू केल्याबद्दल डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा दिल्याबद्दल त्यांनी विशेषतः महायुती सरकारचे व शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत हा निर्णय बळीराजाला मोठा आधार देणारा असल्याचे म्हटले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button