नदीत बुडून 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

नदीत बुडून 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
मुक्ताईनगर प्रतिनिधी | दि. 02 मे 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील उचंद येथे राहणाऱ्या 44 वर्षीय व्यक्तीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव सोपान मुरलीधर पवार (पाटील) असे असून ते शेती व्यवसाय करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास सोपान पवार हे घराबाहेर गेले होते. काही वेळानंतर ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. दरम्यान, गावाजवळील पुलाखालील नदीपात्रात संशयास्पद हालचाल दिसून आल्याने स्थानिकांनी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अपघाती बुडाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



