मलकापूरमहाराष्ट्रविदर्भ

दशनाम गोसावी समाधी बचाव समिती श्री संत गजानन महाराज वाटिका येथे गोसावी समाजाचा संघटीत मेळावा संपन्न

शेगाव प्रतिनिधी

शेगाव -भारतामध्ये सहा हजार पेक्षा अधिक जाती आहेत.जाती, धर्म, वंश, लिंग यावर कोणतेही बंधन नसून आपापल्या धर्माचे आचरण रक्षण करण्याला करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु जाती धर्माच्या जाळ्यातून बाहेर पडत विचारीक संघटना उभा करणे व उच्चशिक्षित होऊन समाजासाठी किंवा समाजाच्या वाटेवर येणारे कार्य करण्यासाठी समाजाला शिकण्याची व उच्चशिक्षित शिक्षण घेऊन संघटित होण्याची गरज आहे. संघटित झाल्याशिवाय आपला समाज प्रगती करू शकत नाही. आपण जर असेच अशिक्षित व संघचित राहिलो तर आपल्या समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही.अशी आवाहन श्री. दासगिरी महाराज (आंबोळा गोरक्षण संस्थान )श्री संत गजानन महाराज वाटिका येथे आपल्या समाज बांधवांना दशनाम गोसावी समाधी बचाव समितीत बोलताना स्पष्ट केले. माझ्या समाजामध्ये लोक निरीक्षक आहेत याची मला खंत आहे. मला समाजासाठी काम करायचं आहे, इथवर मी थांबणार नाही प्रत्येक माणसाला समाजाचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने केलेच पाहिजे असे बोलतांना त्यांनी केले.
समस्या समाजाच्या समस्या लक्षात घेऊन समाधी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 24 11 2022 ला नगरपरिषद शेगाव मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.समाधी भूमी विषय कायदे व समाधी भूमीच्या सर्व समस्यांसाठी ही निवेदन नगरपरिषद शेगाव येथे देण्यात आले होते.तसेच पोलीस भरती बद्दल व तलाठी भरतीबद्दल जास्तीत जास्त लोक या परीक्षेमध्ये उत्तीर्ण कसे होतील व समाजातील इतर समस्या बाबत मार्गदर्शन करण्याचे काम गोसावी समाधी बचाव समिती सर्वेसर्वा चंद्रकांत गिरी महाराज संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष यांनी केले. संत गजानन महाराज पावन भूमी मुळे शेगाव संत नगरी म्हणून ओळखले जाते परंतु दशनाम गोसावी समाधी साठी जागा मिळत नाही.याची मला खंत वाटते. २४/११.२२ रोजी याचे सुद्धा निवेदन नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले. आमची मागणी पूर्ण झाली नाही.तर जन आक्रोश आंदोलन नगर परिषद शेगाव येथे करणार आहोत.पुढे बोलत असताना त्यांनी प्रमुख मागणे देखील केल्या १)दफनभूमीसाठी जागा मिळावी.
२) महाराष्ट्र राज्य सरकारने अटी व शर्ती पूर्ण करण्यात आमचे उभं आयुष्य वाया जात आहे.
देशाला 75 वर्ष पूर्ण होऊनही आम्हाला समाधीसाठी जागा मिळत नाही.आमचा धर्म-धार्मिक बाधित होत आहे येणाऱ्या काळात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हिवाळी अधिवेशनात जन आक्रोश आंदोलन घेऊन नागपूर येथे आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्व समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित राहून सरकारला आमची टाकत दाखून देऊ अशे आव्हाहन चंद्रकांतगिरी महाराज संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष यांनी केले.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे चंद्रकांत गिरी महाराज संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष , विदर्भ प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पुरी, जिल्हाध्यक्ष विठ्ठल भारती पुरी, जिल्हा प्रभारी संजय पुरी. शेगाव तालुका अध्यक्ष गजानन गिरी, शेगाव शहर अध्यक्ष रामेश्वर भारती, शेगाव शहर उपाध्यक्ष श्यामगिरी,कोषाध्यक्ष बबन पुरी सचिव गणेश वी.गिरी,सहसचिव गणेश शी.गिरी, संघटक पांडुरंग भारती,धार्मिक प्रकोष्ठ श्यामभारती मार्गदर्शक महेश गिरी, सरचिटणीस तुषार गिरी, युवा अध्यक्ष मनोज गिरी तथा प्रदेशातील तसेच जिल्हा तालुका व शेगाव शहर च्या वतीने समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते,महिला व पत्रकार बंधू उपस्थित होते
.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button