क्राईमजळगावा जिल्हामहाराष्ट्र

पांझरा नदीपात्रात मध्यरात्री थरार: वाळूमाफियांनी मंडळाधिकाऱ्याच्या कपाळाला लावले गावठी पिस्तूल; मारवड पोलीसात गुन्हा दाखल

पांझरा नदीपात्रात मध्यरात्री थरार: वाळूमाफियांनी मंडळाधिकाऱ्याच्या कपाळाला लावले गावठी पिस्तूल; मारवड पोलीसात गुन्हा दाखलअमळनेर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुक्यातील मांडळ शिवारातील पांझरा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महूसल कर्मचाऱ्यांच्या डोळ्यावर १० ते १२ वाळूमाफियांनी स्प्रे मारून दुखापत केली तर एकाने गावठी कट्ट्याचा धाक दाखवून जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता घडली आहे. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मांडळ शिवारातील पांझरा नदीपात्रात रविवारी ७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अवैधपणे वाळूचा उपसा होत असल्याचे वावडे येथील मंडळाधिकारी पुरूषोत्तम शिवाजी पाटील वय ३६ आणि त्यांचे सहकारी जितेंद्र दिलीप पाटील हे रात्री गस्त घालत असतांना दिसून आले. त्यानुसार ते कारवाई करण्यासाठी नदीपात्रात उतरले. त्यावेळी नदीपात्रात दोन ट्रॅक्टरमध्ये जेसीबीच्या मध्यमातून वाळू भरतांना आढळून आले. त्यावेळी ट्रॅक्टर चालक आणि जेसीबी चालक यांना वाळू वाहतूकीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मंडळाधिकारी पुरूषोत्तम पाटील यांनी सदर वाहन अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्याचे सांगितले. त्यावेळी

त्याठिकाणी अनोळखी १० ते १२ जणा तोंडावर मफलर आणि रूमाल बांधून आले. त्यांच्याहाता लाठ्याकाठ्या देखील होत्या. सर्वांनी जितेंद्र पाटील याला शिवीगाळ करत हुज्जत घातली. ट्रॅक्टर व जेसीबी सोडून द्या नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. वाळूमाफियांनी हातातील स्प्रे जितेंद्र पाटील यांच्या तोंडावर व डोळ्यांवर मारला. त्यानंतर एकजण गावठी पिस्तून मंडळाधिकारी पुरूषोत्तम पाटील यांच्या कपाळाला लावून “जर तुम्ही येथून निघाला नाही तर तुम्हाला जीवेठार टाकेल व यापुढे तुम्ही या नदीपात्रात आलात तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. त्यावेळी दोन्ही ट्रॅक्टर, जेसीबी आणि दुचाकीवर आलेले सर्व जण वाहने घेवून पसार झाले. ही घटना घडल्यानंतर मंडळाधिकारी पुरूषोत्तम पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करीत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button