सरपंचाविरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल

सरपंचाविरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव | तालुक्यातील तरोडा डी सरपंच प्रवीण रामरतन कडाळे यांच्याविरूध्द शेगाव तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. सदर ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांनी हा प्रस्ताव दाखल केला असून त्यामध्ये सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणे, ग्रामपंचायतीचा हिशोब व बिले व्यवस्थित न ठेवणे, सरपंचपदाचा दुरूपयोग तसेच मागासवर्गिय वस्तीमध्ये हेतुपुरस्सरपणे विकासकामे टाळणे, संशयास्पद वागणूक ठेवणे असे आरोप करण्यात आले आहेत.अविश्वास प्रस्तावावर ग्रा.पं.सदस्या चंद्रकला बाबुराव कडाळे, मुक्ता अरूण कडाळे, राधा सुधाकर बावस्कार, शुभांगी गोपाळ जुमळे, उषाताई देवानंद गाळेकर, देवानंद पांडुरंग गाळेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अशाप्रकारे सरपंच प्रवीण कडाळे यांच्याविरूध्द सहा विरूध्द एक असा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला असून तहसीलदार यांनी १८ ऑगस्ट रोजी पडताळणी करिता ग्रा.पं. सदस्यांच्या सभेचे आयोजन केले आहे.



