समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे १ सप्टेंबरला चिखलीत भव्य मोफत आरोग्य शिबिर

स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी
प्रतिनिधी-संजय खेडेकर
चिखली : समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, चिखलीच्या वतीने विद्याधर महाले ( स्वीय सचिव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ) तथा चिखली नगरपरिषदेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सु. रा. चुनावाले आयुर्वेद महाविद्यालय, चिखली येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे.
या आजारांची होणार तपासणी
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर या शिबिरात शिबिरात हृदयरोग, हाडांचे आजार, मणक्याचे आजार, महिलांचे आजार, किडनीचे आजार, मधुमेह तसेच लहान मुलांचे विविध आजार यावर मोफत तपासणी मार्गदर्शन व औषधोपचार करणार आहेत. तसेच आवश्यक असलेल्या पॅथॉलॉजी टेस्ट साठी रुग्णांना ५० टक्के सवलत देखील देण्यात आली आहे.
आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते उद्घाटन
शिबिराचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्वेताताई महाले यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, चिखलीचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे राहणार आहेत. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रेमराज भाला, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्त, व्यास कॅन्सर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र व्यास, ग्रंथालय भारतीचे प्रदेश सचिव सुनील वायाळ, चिखली नगरपरिषदेचे भाजपा गटनेते अमोल कबुतरे आणि आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा
चिखली शहर व परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रेणुकादास मुळे यांनी केले आहे. रेणुकादास मुळे, अध्यक्ष, समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठान — ९८५०६१३०९३ तसेच सु. रा. चुनावाले आयुर्वेद महाविद्यालय, दि चिखली अर्बन बँक, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखा, जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूल, तोरणा महिला अर्बन पतसंस्था, आनंद मेडिकल स्टोअर (जयस्तंभ चौक) आणि अपराजीत मेडिकल (बसस्थानकासमोर) यांच्याकडे या आरोग्य शिबिरासाठी नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.



