श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानूंगा विद्यालयामध्ये प्रवेशोत्सव 2026 उत्साहात साजरा…

हिवरखेड : येथील महात्मा फुले शिक्षण संस्था हिवरखेड द्वारा संचलित श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानुंगा विद्यालयामध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल कुमारजी भोपळे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे कार्यवाह श्री श्यामशील जी भोपळे, आडगाव येतील प्रतिष्टीत नागरिक अशोक राव घाटे,अनिल राव घाटे,संस्थे चे संचालक शिवकुमार जी मार्के तसेच माधव काळे सर उपस्थिती होते या प्रसंगी नव प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती या वेळी उपस्थित मान्यवर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका यांनी नव प्रवेशित विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ नवीन पुस्तके तसेच नवीन दप्तर देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या प्रवेशोत्सवावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन आनंददायी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या या उत्सवाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापक रवींद्र सोळंके सर यांनी केले तर संचालन पर्यवेक्षिका सौ बांगर मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता गोकुळा झापर्डे मॅडम,सीमा धुमाळे मॅडम,अंकुश हिवराळे सर,आरती इंगळे मॅडम,गायत्री इंगळे मॅडम, आनंद राऊत सर.महात्मा फुले वाचनालयाचे ग्रंथपाल चंद्रभूषण इंगळे विद्यालयाचे लिपिक योगेश राऊत तसेच शिपाई सुनील धुरदेव यांचे सहकार्य लाभले…



