बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तिवळी गावावर शोककळा, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल,

तिवळी गावावर शोककळा, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :- प्रशांत चव्हाण

वाशिम :- मालेगाव तालुक्यातील तिवळी गावामध्ये दि.13 जून रोजी मन हेलावून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शेत जमिनीच्या वादाला कंटाळून संतोष बकाल (वय38वर्ष) या विवाहित तरुणाने शेतातील इलेक्ट्रिक टावरला गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे त्यांची पत्नी.वर्षा बकाल,मुलगी जानवी बकाल, आणि मुलगा सोहम बकाल यांचे मृतदेह विहिरीमध्ये आढळून आले.त्यानंतर मृत संतोष बकाल यांचे मेहुणे (पत्नीचा भाऊ) यांनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून. दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे एकूण चार आरोपी विरुद्ध विविध कलमअंतर्गत शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
मृत संतोष बकाल व त्यांचे भाऊ महादेव बकाल यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू होता. या त्रासाला कंटाळूनच संतोष बकाल यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे, यापूर्वी दोन वेळा पोलिसात तक्रार दाखलही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.14 जून रोजी बकाल कुटुंबीयांवर तिवळी गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना घडल्याने गावकऱ्यांचे डोळे पाणावले असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button