खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसंपादकीय

मुक्ताईनगर आठवडे बाजारात नियमावलीचा बेमालूम भंग; वाहतूक कोंडी आणि नागरिक त्रस्त

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर शहरात दर आठवड्याला होणाऱ्या बाजारासाठी जवळपास दहा ते पंधरा खेड्यांमधील नागरिक खरेदीसाठी येतात. मात्र नगरपालिकेने आखून दिलेल्या नियमावलीचा बेमालूम भंग होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ठरवून दिलेल्या जागेऐवजी बाजार रस्त्यावर पसरत असून, परिवर्तन चौक ते जुनी बस स्टॅन्ड या दरम्यानची बाजारपेठ गर्दीने फुलली आहे.

या अनियमिततेमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. ठेकेदारांना नगरपालिकेकडून स्पष्ट नियमावली देण्यात आलेली असतानाही ती पाळली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. यामुळे वाहनचालकांना अक्षरशः ‘जोखीम मुठीत’ घेऊन मार्ग काढावा लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

तसेच, बाजाराच्या ठरलेल्या जागेच्या बाहेर पसरलेल्या विक्रीतून स्वयंघोषित कर्मचारी किंवा दलालांकडून वाहनधारकांकडून पैसे वसूल होत असल्याच्या तक्रारी देखील पुढे येत आहेत. काटा वजनांवर घेतला जाणारा अधिकृत कर टाळून “आंबा-संभा” नावाखाली अवैध वसुली होत असल्याचा आरोप काही विक्रेत्यांनी केला आहे.

मोठी वाहने बाजाराच्या आतील भागात आणून दुकानांच्या बाजूला लावल्याने चार ते पाच विक्रेत्यांची जागा अडकून पडत आहे. यामुळे केवळ ग्राहकांनाच नव्हे तर इतर विक्रेत्यांनाही व्यापारात अडथळा येत आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजाराबाहेर ठेवली जाणारी वाहने आता बाजारातच शिरल्याने संपूर्ण बाजार व्यवस्थाच कोलमडल्याचे चित्र आहे.

याबाबत नगरपालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होणार का, तसेच नवीन नियमावली आखून नागरिक आणि विक्रेत्यांना दिलासा मिळणार का, हा प्रश्न सध्या शहरात चर्चेत आहे. व्यापारी वर्गाने देखील या परिस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button