अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अकोला (पश्चिम) जिल्हा संघटक पदी विकास दामोदर यांची नियुक्ती

पत्रकारांचे हक्क आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर ; विकास दामोदर
विजय मनोहरराव घोडे
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला जिल्हा प्रतिनिधी :
दि. 4 एप्रिल 26 | तेल्हारा तालुका अंतर्गत येत असलेल्या घोडेगाव येथील विकास दामोदर यांची नुकतीच अकोला (पश्चिम) जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न प्रकर्षाने मांडण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने, विकास दामोदर यांची अकोला (पश्चिम) जिल्हा संघटक पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
या निवडीसाठी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष सुरेशराव सवळे, केंद्रीय सरचिटणीस राजेंद्र भुरे, चिटणीस अशोकराव पवार, केंद्रीय उपाध्यक्ष प्रदिप जोशी, प्रा. रविंद्र मेंढे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे आणि पश्चिम विदर्भ अध्यक्ष पुरुषोत्तम इंगोले यांनी विशेष पुढाकार घेतला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.
विकास दामोदर यांच्या निवडीमुळे अकोला जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांच्या संघटनात्मक कार्याला मोठे बळ मिळणार आहे. पत्रकारांचे हक्क आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी आपण सदैव तत्पर राहू, असा विश्वास नूतन जिल्हा संघटक विकास दामोदर यांनी यावेळी व्यक्त केला.



