जळगावा जिल्हासंपादकीय

आमदारांचा राग का येत नाही?

आमदारांचा राग का येत नाही?

आता आमदारांचा राग सुद्धा आला पाहिजे.जो नालायक आहे,जो बदमाष आहे त्याचा राग आल्याशिवाय आपल्याला बळ येतं नाही.सैंनिकाला शत्रुचा राग आल्याशिवाय तो फायर करूच शकत नाही.जर प्रेम असेल, मैत्री असेल किंवा शत्रू ला सामील असेल तर आपला सैनिक आपल्या शत्रू ला फायर करू शकत नाही. आता राग का येत नाही?एकतर पिडीताला ,मतदाराला हक्काची जाणीव नाही.काहींना झाली असेलही पण भय आहे.आपण जर या आमदार विरोधात बोललो तर तो आपल्यावर नाराज होईल.आपले काम अडवून धरील.पण मी म्हणतो, कोणाच्या भरोशाने जन्माला आले आहात काय? कोणाच्या भरोशाने जगत आहात काय?तुमचे मरण कोणाच्या अधिकारात आहे काय? मला वाटते असे काहीच नाही.किमान लोकशाही प्रणालीत तरी असे शक्य नाही.माणूस आईबापांच्या मर्जीने जन्माला येतो.त्याची जगण्याची तजवीज ईश्वर करून ठेवतो.गरजेपेक्षा जास्त तजवीज बाप करून ठेवतो.मरणाची तारीख यमराज ठरवतो.तर मग, हा कोण दिड दमडीचा चोर,ज्याचे भय लोक बाळगतात? असे अनेक जन्म आमदार शिवाय होतात.असे अनेकांचे शिक्षण आमदार शिवाय होते.असे अनेक तरुण आमदार शिवाय नोकरीवर लागले.असे अनेक शेतकरी,व्यापारी, दुकानदार आमदाराचे तोंड सुद्धा पाहात नाहीत.उलट हाच चोर त्यांच्या कडे जातो.पाया पडतो.मत मागतो.हे नियोजन तर लोकशाही प्रणालीत करून ठेवलेले आहे. युरोप मधे इ.स.१६००पासून लोकशाही सुरू झाली.ती सुद्धा राजे महाराजे यांच्या सम्मतीने.अजूनही इंग्लंड मधे राजा आहे.तरीही लोकशाही मजबूत आणि शाबूत आहे.आपल्या भारतात तर कोणीच राजा महाराजा शिल्लक राहिलेला नाही.जे होते ते आता चित्रांचे आणि पुतळ्यांचे आहेत.त्यांची भीती राहिलेली नाही.तरी काही बदमाष त्या राजांच्या प्रतिमेचा गैरफायदा घेतात.असे बदमाष, माथेफिरू हे लोकशाही ला मारक आहेत.घातक आहेत.हे फक्त माथेफिरू नाहीत,चोर सुद्धा आहेत.भारतीय राजे महाराजे,संत , समाजसुधारक याच चोरांच्या खाजगी मालमत्ता झाल्या आहेत.म्हणूनच या चोरांमुळे राजे महाराजे, समाजसुधारक,संत यांची प्रतिमा मलिन होत आहे. हे आहे वास्तव.वाईट आहे.धोकेदायक आहे.हानीकारक आहे.तर मग, तुम्ही विचारता,काका,यावर इलाज काय?हो आहे ,इलाज.या चोरांना निवडणुकीत निवडून देऊ नका.ज्यांनी आमच्या राजे महाराजे,संतांना खाजगी मालमत्ता समजून बदनाम केले आहे.करीत आहेत.ज्यांनी आमच्या विकासाचा पैसा चोरून नेला आहे.ते चंबळच्या डाकूंपेक्षा जास्त बदमाष आहेत.हे दारू विकतात.हे रेतीची चोरी करतात.हे डान्सबार चालवतात.हे गुलाबी गॅंग चालवतात.हे गुंडांची गॅंग चालवतात.हे समाजाला घातक नाहीत का?हे धर्माचे शत्रू नाहीत का?राजकीय व्यवस्थेला घातक नाहीत का?हे आमच्या विकासाला बाधक नाहीत का?.

. शिवराम पाटील

महाराष्ट्र जागृत जनमंचजळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button