मलकापूर तालुक्यातील वाकोडी येथील शेत शिवारात असलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभाला यश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी मलकापूर:- तालुक्यातील वाकोडी शेत शिवारात गत दोन ते तीन दिवसांपासून जंगली जनावराने दहशत माजवली होती. गावातील शेतकऱ्यांना काम करत असतांना 24 मार्च च्या सायंकाळी जंगली जनावर दिसले त्यानी या बाबत माहिती सरपंच शुभम काजळे यांना दिली. शुभम काजळे यांनी माजी आमदार संचेतीयांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती कळवली. त्यानी तात्काळ वन विभाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिली. वन विभागाची टीम घटनास्थळी पोहचली मात्र तो पर्यंत बिबट्या तिथून पसार झाला होता. वन विभाच्या टीम नी शोधाशोध सुरू केली मात्र रात्र झाली असल्यामुळे शोध मोहित थांबविण्यात आली. बिबट्या की वाघ हे निश्चित नसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्या आहे की वाघ हे कोणालाच कळले नाही. परंतु 25 मार्च ला सकाळी धुलीवंदनाच्या दिवशी गावातील एका शेतकऱ्याला त्यांच्या शेतामध्ये बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याला बघताच त्यांनी या संदर्भात ग्रामस्थांना माहिती दिली व गावकऱ्यांनी बिबट्याला बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. याबाबतची माहिती सरपंच शुभम काजळे व ग्रामपंचायत सदस्य योगेश काजळे यांनी तात्काळ भ्रमणध्वनी द्वारे वनविभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स युनिट या पथकाला माहिती दिली. पथकाने गांभीर्य लक्षात घेत त्याला पकडण्याचे सर्व साहित्य सोबत घेत बिबट्या असलेल्या शेत शिवारात दाखल झाले. बिबट्या रात्रभर शेतामध्ये होता. त्यांना शेतातील पिके खाऊन सुस्त अवस्थेत शेतात फिरत असतांना शेतकऱ्यांना दिसला. रॅपिड रिस्पॉन्स युनिट घटनास्थळी पोहचले व बिबट्याला पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले. बिबट्या सुस्त असल्याने नागरिक दिसून सुद्धा पळ काढत नव्हता. दरम्यान बिबट्याला गन मशीनद्वारे बेशुध्द होण्याचे इंजेक्शन दिले. बिबट्या काही क्षणातच बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला रेस्क्यू करून वन विभागाच्या टीमने पिंजऱ्यात जेरबंद करून घेऊन गेले. ही कारवाई सहाय्यक वनरक्षक ए.एन. ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, आर.बी. शिरसाट,रेस्क्यू टीमचे संदीप मडावी, एस.एस.यांनी केली यावेळी डॉ. गजानन भोळे, श्रीकृष्ण उगले, दिलीप तायडे, मलकापूर पोलीस, होमगार्ड पथक, सरपंच शुभम काजळे ग्रामपंचायत सदस्य योगेश काजळे, शेतकरी बळीराम कुयटे, सुनील ठाकूर, रोहित तायडे, मुरलीधर काजळे, परमेश्वर काजळे आदींनी मदत कार्य केले.




