खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरशैक्षणिक

गौरवशाली निकालाची परंपरा कायम; जे. ई. स्कूलचा बारावी निकाल 88.70%

मुक्ताईनगर प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगरने यंदाही बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपली गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. एकूण 558 विद्यार्थ्यांपैकी 495 विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा एकूण निकाल 88.70 टक्के लागला आहे. विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

विज्ञान शाखेने नेहमीप्रमाणे आघाडी घेत 97.59 टक्के निकाल नोंदवला. या शाखेतून 374 पैकी 365 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. लक्ष्मी विजय पाटील व कु. ऐश्वर्या सुरेश नाले यांनी प्रत्येकी 507 गुण (84.5%) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. विनीत नितीन पाटील (491 गुण, 81.83%) द्वितीय तर मानस प्रमोद पाटील (482 गुण, 80.33%) तृतीय आला.

कला शाखेचा निकाल 65.07 टक्के लागला असून 126 पैकी 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. कोमल किशोर हिरोळे (426 गुण, 71%) प्रथम, कु. प्रेरणा रमेश पोहेकर (372 गुण, 62%) द्वितीय, तर कु. नीलिमा मिलिंद लवंगे (360 गुण, 60%) तृतीय ठरली.

वाणिज्य शाखेत 58 पैकी 48 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 82.75 टक्के निकाल लागला. भूषण सुभाष पाटील (387 गुण, 64.5%) प्रथम, दीपक उल्हास पाटील (362 गुण, 60.33%) द्वितीय, तर शुभम समाधान धनगर (347 गुण, 57.83%) तृतीय क्रमांकावर राहिला.

किमान कौशल्य विभागातही समाधानकारक कामगिरी दिसून आली. 46 पैकी 37 विद्यार्थी उत्तीर्ण होत 80.43 टक्के निकाल लागला. ऋषिकेश ब्रिजलाल बोरे (320 गुण, 53.33%) प्रथम, तर कु. भाग्यश्री श्रावण कोळी (303 गुण, 50.50%) द्वितीय आली.

या यशाबद्दल संस्थेचे सर्वेसर्वा आमदार एकनाथराव खडसे, चेअरमन ॲड. सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर, उपाध्यक्ष नारायणराव चौधरी, सचिव डॉ. सी. एस. दादा चौधरी तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाचे प्राचार्य विकास एम. चौधरी, उपमुख्याध्यापिका वंदना शिर्के, पर्यवेक्षक के. आर. कवळे, व्ही. डी. बऱ्हाटे, एस. पी. राठोड, सौ. व्ही. एस. राणे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सातत्यपूर्ण निकाल, विज्ञान शाखेतील उच्च टक्केवारी आणि इतर शाखांमधील समाधानकारक कामगिरी यामुळे संस्थेची शैक्षणिक घडण मजबूत असल्याचे स्पष्ट होते. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन व संस्थेची शिस्तबद्ध शैक्षणिक पद्धती महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे अधोरेखित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button