जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सहस्त्रलिंग ता रावेर येथे “परिवर्तनाच्या वाटेवर” या उपक्रमा अंतर्गत अकरावे वाटसरू श्री हबीब तडवी सर यांचे जादूच्या प्रयोगांचे सादरीकरण ……..

जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सहस्त्रलिंग ता रावेर येथे “परिवर्तनाच्या वाटेवर” या उपक्रमा अंतर्गत अकरावे वाटसरू श्री हबीब तडवी सर यांचे जादूच्या प्रयोगांचे सादरीकरण ……..
सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले नंतर श्री हबीब तडवी सरांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री युनूस तडवी यांनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन केले. मुख्याध्यापक श्री विकास सुरवाडे सरांनी उपस्थितांना त्यांचा परीचय करून दिला.श्री हबीब तडवी सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध जादूचे प्रयोग सादर केले. जसे की रिकाम्या पिशवीतून विविध वस्तू काढणे, पत्ते गायब करणे किंवा बदलणे , कागदापासून पैसे , रंगीत कापडाच्या तुकड्यां पासून झेंडा तयार करणे .विद्यार्थ्यांना बोलतं करत ही जादू नसून हातचलाखी आहे हे लक्षात आणून दिले व अंगात येणे ,भूत या गोष्टी खोट्या आहेत व आपल्या स्वतःच्या गावी भाटखेडा येथे स्मशानभूमी मध्ये सुशोभीकरण केले व विद्यार्थ्यांची भिती दूर व्हावी म्हणून विद्यार्थ्यांची सहलही त्या ठीकाणी नेली जाते ही माहिती दिली.
सरांच्या कृतीने विद्यार्थ्यांना विचार करायला वाव मिळाला व सुक्ष्म निरीक्षण करत बऱ्याच बाबी हेरण्याचा विद्यार्थ्यांनीही प्रयत्न केला. सदर प्रयोगामुळे विद्यार्थ्यांचे मनोरंजन तर झालेच परंतू त्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर होण्यास व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यास निश्चितच मदत झाली. कालच सरांचे चिरंजीव डॉ सोहेल हबीब तडवी यांची बोदवड येथे मेडीकल ऑफीसर म्हणून निवड झाली व योगायोगाने त्यांची उच्च विद्याविभूषित कन्या आफरीनताई ( ग्रामसेवक ) व जावई इरफान तडवी (पोस्ट मास्टर रावेर) यांचे पुत्र शयान याचाही आज वाढदिवस आहे त्यानिमित्त सर्व शिक्षक, विद्यार्थी व गावकऱ्यांनी तडवी परिवाराला शुभेच्छा दिल्या .व या निमित्ताने सरांनी उपस्थितांचे लाडू वाटून तोंड गोड केले.
या आठवड्याचा “साप्ताहीक अभ्यास विजेता” म्हणून अलिम कबीर तडवी इयत्ता पाचवी यांस श्री हबीब तडवी सरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
परिवर्तनाच्या वाटेवर या उपक्रमापासून व आलेल्या सर्व वाटसरूंकडून प्रेरणा घेत गावातील तरुण विद्यार्थ्यांनी गावात एक छोटेखानी वाचनालय सुरू केले त्याचे उद्घाटनही श्री हबीब तडवी यांनी फित कापून केले.कार्यकमाचे सुत्रसंचालन श्री साईनाथ चन्ने सरांनी केले व आभार श्रीमती नमिरा तडवी मॅडमांनी मानले . कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मुबारक तडवी , शिक्षणप्रेमी आसिफ तडवी, रमजान तडवी , शाबेरा ताई तडवी, शकीला तडवी व गावातील तरुण मंडळी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.



