रामानंद नगर पोलीस स्टेशनची सर्वात मोठी कारवाई

स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस जळगाव
रामानंद नगर पो.स्टे.
दि.08/01/2025
रामानंद नगर पोस्टे हद्दीत राहणारा अटल गुन्हेगार जेनसिंग ऊर्फ झेनसिंग ऊर्फ लकी जिवनसिंग जुन्नी याला करण्यात आले स्थानबध्द
त्याबाबत सविस्तर माहिती अशी की,
1) रामानंद नगर पो.स्टे. हद्दीतील अट्टल गुन्हेगार “धोकादायक इसम” नामे जेनसिंग ऊर्फ झेनसिंग ऊर्फ लकी जिवनसिंग जुन्नी वय 34 रा. राजीव गांधी नगर जळगाव याचे वर रामानंद नगर पोलीस स्टेशनला तसेच इतर पोलीस स्टेशनला अनुक्रमे याचे वर 07 गंभीर स्वरुपाचे गुन्हे जसे दरोडा टाकणे, मारामारी, गंभीर स्वरुपाची दुखापत करणे, अनधिकृत पणे घरात प्रवेश करुन मारहाण करुन खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, शस्त्र अधिनियमाचे उल्लंघन करणे तसेच हिंदु मुस्लीम यासारखे अदखलपात्र स्वरुपाची पनाका तसेच गुन्हे दाखल असुन त्याचे वर CRPC 110 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याच्या वर्तनात कोणताही प्रकारचा बदल झालेला नाही. तो नेहमी खंडेराव नगर पुल परीसरातील तसेच बुधवारच्या बाजारात सामान्य लोकांना धमकावत असुन जळगावं शहरात व इतर जिल्हयात जाऊन घरफोडी करणे चोरी करणे, दरोडा घालणे तसेच हाणामारी करुन सामान्यांचे नुकसान करीत होता.
करीता धोकादायक इसमांवर कायद्याचा वचक राहावा व भीती राहावी तसेच त्यांच्या हातुन समान्य लोकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरीता पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी सदर इसमांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभुमी काढुन मा. पोलीस अधिक्षक श्री. महेश्वर रेड्डी सर. मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावित तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे मोलाचे मार्गदर्शन व मदत घेऊन “धोकादायक इसम” नामे जेनसिंग ऊर्फ झेनसिंग ऊर्फ लकी जिवनसिंग जुन्नी वय -34 रा. राजीव गांधी नगर जळगाव यांला एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत मध्यवर्ती कारागृह नागपुर स्थानबद्ध करण्यात आले आहे.
हि कार्यवाही करताना प्रामुख्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सफौ. १७२८ संजय सपकाळे, पोहेकॉ/2451 इरफान मलिक पो.हे.कॉ.७४२ सुशील चौधरी, पोहेकों/जितेंद्र राजपुत, पोहेकों/जितेंद्र राठोड पो.हे.कॉ. सुनील दामोदरे (स्थानिक गुन्हे शाखा जळगाव) पोना/हेमंत कळसकर पो.ना. २९९५ रेवानंद साळुंखे, पोना / 3071 विनोद सुर्यवंशी पो.कॉ. ३३८८ रवींद्र चौधरी, पोकों/उमेश पवार, या सर्वांनी स्थानबद्ध करण्यात आलेल्या धोकादायक व्यक्तींच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यांच्या कागदपत्रांची पुर्तता करून घेऊन त्यास स्थानबद्ध करणे बाबत महत्वाची भुमिका पार पाडली आहे तसेच स्थानबध्द इसमास मध्यवर्ती कारागृह नागपुर येथे स्थानबध्द सपोनि/विठठ्ठल पाटील, पोको/तेजस सोनवणे पोकों/ईकबाल पिंजारी केले.
(राजेंद्र गुंजाळ) पोलीस निरीक्षक रामानंद नगर पो.स्टे. जळगांव



