खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुक्यात २० वर्षीय विवाहित महिला बेपत्ता


मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील लोखंडेवाडी, कुन्हाडा रस्त्यावर राहणारी २० वर्षीय विवाहित महिला दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडून बेपत्ता झाली आहे.
सदर प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे मिसिंगची नोंद करण्यात आली असून नोंद क्रमांक 0014/2026 असा आहे.
महिलेचे नाव – सौ. मोनिका विजय झुंजार (वय २० वर्षे) असून त्या लोखंडेवाडी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथील रहिवासी आहेत. त्या घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे.
कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे शोध घेतला असता त्या आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की संबंधित महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button