बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

SC उपवर्गीकरणाविरोधात एल्गार; संग्रामपूर तहसीलवर ६ जुलै रोजी संविधान संरक्षण समितीचा विराट महामोर्चा…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर:- २४ जून २०२६
सर्वोच्च न्यायालयाच्या SC उपवर्गीकरणासंदर्भातील निर्णयाच्या विरोधात संविधान संरक्षण समितीच्या वतीने संग्रामपूर येथे ६ जुलै २०२६ रोजी विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संग्रामपूर तहसील कार्यालयावर धडक देणाऱ्या या मोर्चात जिल्हाभरातील आंबेडकरी, सामाजिक व संविधानवादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
संविधान संरक्षण समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या महामोर्चातून अनुसूचित जातींच्या आरक्षणाला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही निर्णयाला विरोध दर्शविण्यात येणार आहे. “SC आरक्षण की छेडछाड नहीं होने देंगे” असा निर्धार व्यक्त करत संविधानातील समानता, सामाजिक न्याय आणि आरक्षणाचे हक्क अबाधित ठेवण्याची मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संग्रामपूर तालुक्यात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून गावोगावी बैठका, पत्रक वाटप आणि संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. विविध सामाजिक संघटना, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या महामोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजकांच्या मते, हा मोर्चा केवळ एका निर्णयाविरोधातील आंदोलन नसून संविधानिक हक्क, सामाजिक समता आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी उभारलेला लोकशक्तीचा आवाज आहे. त्यामुळे ६ जुलै रोजी संग्रामपूर तहसील कार्यालय परिसरात मोठ्या जनसमुदायाची उपस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.”आरक्षणाच्या संरक्षणासाठी एकवटणार जनसागर संग्रामपूर तहसीलवर लाखोंचा एल्गार होणार…..✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button