खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

निराधार व निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वाची सूचना ; मोबाईल अ‍ॅपद्वारे हयातीचा दाखला जमा करण्याचे निर्देश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

निराधार व निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वाची सूचना ; मोबाईल अ‍ॅपद्वारे हयातीचा दाखला जमा करण्याचे निर्देश

मुक्ताईनगर :तहसील कार्यालय मुक्ताईनगर यांच्या मार्फत केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना तसेच संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे.शासन निर्णयानुसार सर्व लाभार्थ्यांनी आपले हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने निर्धारित मुदतीत सादर करणे आवश्यक असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे अथवा ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करावी असे सांगण्यात आले आहे.यासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करून लाभार्थ्याचा फोटो अपलोड करत हयातीचा दाखला ऑनलाईन सबमिट करावा लागणार आहे. तसेच त्याची एक प्रत तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेत जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.लाभार्थ्यांची यादी संबंधित तलाठी सज्जावर प्रसिद्ध करण्यात आली असून, काही अडचण असल्यास ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा कोतवाल यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button