खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

रावेर लोकसभा अंतर्गत रावेर तालुक्यातील १९ नुकसानग्रस्त गावांना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट…

दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यासह रावेर लोकसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीट यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी दिले. तसेच त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्याशी संवाद साधला.

या दौऱ्यात त्यांनी भाजप पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांसह केऱ्हाळे बु., अहिरवाडी, पाडले खु., पाडले बु., निरूळ, खानापूर, चोरवड, अजनाड, अटवाडे, दोधे, नेहेते, खिरवड, मोरगाव, वाघोड, कर्जोद, भोकरी, तामसवाडी, पातोंडी व निंभोरे सिम या १९ गावांमध्ये जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीच्या हानीबाबत माहिती घेतली तसेच शासन व विमा कंपनीमार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यांची स्थिती जाणून घेतली.

याच दौऱ्यात त्यांनी काही ठिकाणी आयोजित धार्मिक कार्यक्रमांना भेट दिली तसेच गावांमध्ये दुःखद निधन झालेल्या ग्रामस्थांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

या प्रसंगी स्थानिक भाजपा पदाधिकारीकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button