
उपविभागीय अधिकारी खांमगाव कार्यालयातील दप्तर दिरंगाई बाबत चौकशीचे आदेश
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे ) 1 आॅगस्ट शेगाव शहरातील ओमप्रकाश टेकडीवाल रा. कालपांडे जिन , देवकी टावर शेगांव यांनी शेगाव भाग २ मधील शेत सर्व्हे नं . ३४५/५ मधील २३ एक्कर ९ गुंठे शेतजमीनीच्या फेरफार क्र . ४७६ व १६२२ या बाबत उपविभागीय अधिकारी ( महसुल ) खामगाव यां यांच्याकडे जुलै २०१८ मध्ये एका अर्जाद्वारे हरकत घेतली होती , परंतु या हरकतीवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे ओमप्रकाश टेकडीवाल अर्जदार यांनी २७ जानेवारी २० रोजीच्या अर्जान्वये सामान्य आस्थापना विभाग जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तक्रार केली असता फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांच्या हरकतीची दखल घेण्यात आली . कार्यवाहीसाठी सुमारे ३ वर्षाचा कालावधी लागला म्हणुन दप्तर दिरंगाई बाबत संबंधितांविरूध्द शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तब्बल पाचवेळा करण्यात आली . अखेर उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी २१ जुलै २३ जा.क्र.राजस्व /कक्ष 7(3)/ म.स/कावि/310-2023 रोजीच्या पत्रानुसार उपविभागीय अधिकारी महसुल खामगाव यांनी एका पत्राद्वारे सदर प्रकरणात सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत . तिन वर्ष जर अहवाल सादर करण्यासाठी लागत असतील तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे



