बुलढाणामहाराष्ट्र

विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेची निदर्शने

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

खामगाव
मागील चार वर्षाच्या कालावधीतील देय होणारी थकबाकी त्वरीत अदा करण्यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी एसटी कामगार संघटनेच्या वतीने शेगाव बस स्थानक परिसरात ५ मार्च रोजी निदर्शने करण्यात आली,

सन २०१८ ची महागाई भत्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा मा. न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा. सन २०१६ ते २०२० या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतन वाढ यातील मान्य केल्याप्रमाणे घरभाडे भत्याचा दर ८,१६,२४ टक्के करून थकबाकी त्वरित अदा करा, सन २०१६ ते २०२० या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतन वाढ यातील वार्षिक वेतन वाढीचा दर एकतर्फी १ टक्क्याने कमी केलेला होता तो पुर्वतक्षीप्रमाणे २३ करून त्याची यकबाकी त्वरित द्या, सर्व देय थकबाकी रकमेच्या अधिन राहून

कामगारांना सध्या मिळत असलेली वाढीव थकबाकी रक्कम पूर्वीप्रमाणे माहे मार्च २०२५ पासून पूढे तशीच सुरु ठेवा. शासकीय कर्मचान्यांप्रमाणे रा. प. कामगारांचा महागाई भत्ता ५३ टक्के करून थकबाकीसह त्वरित द्या. भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून कामगारांच्या मागणीनुसार त्वरित उचल द्या. प्रवासीभाहे बाढ़ पूर्वीप्रमाणे ५ रूपयांच्या पटीत करून सुधारित भाडे करा, अन्यायकारक शिस्त व आवेदन पध्दत रद्द करून नविन सुधारित शिस्त आवेदन पध्दत तयार करून लागू करा. कोरोना कालावधीत कामगारांचे घेतलेले रजेचे अर्ज रद्द करून त्यांना एल. डी. पी. (लॉकडाऊन हजेरी

लावून त्यांची राजा त्यांच्या खात्यावर वर्ग (संचित करा. बारा महिन्यात बालवण्यात येणाऱ्या रा.प. नियतांची सरासरी विचारात घेऊन कामगारांना समय वेतनश्रेणीवर (आर.टी. एस.) घेण्याचे मान्य केल्याप्रमाणे परिपत्रीय सूचना (आदेश) काढा व अंमलबजावणी करा. मल्टीट्रेड बाबत मा. महाव्यवस्थापक यांच्याकडून मान्य केल्याप्रमाणे यांच्या समवेत रा.प. प्रशासन व संघटना प्रतिनीधी यांच्या त्वरित बैठक घेऊन तोडगा काढा. आर.टी.ओ. विभागाकडून होणारी दंडात्मक कारवाई चालकांच्या पगार खात्यातून वसूल करणे मान्य केल्याप्रमाणे त्वरित बंद करा. खात्यांतर्गत उत्तीर्ण झालेल्या

कामगारांना बढत्या देतांना प्रथम बदली अर्जानूसार बदल्या देऊन उर्वरित रिक्त जागांवर बदल्या या.. कार्यशाळा कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढा. कार्यशाळेला स्पेअर पार्ट पुरवठा करा, अशा विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत.

यावेळी शेगाव आगार कामगार संघटना अध्यक्ष शेषराव निंबाळकर, आगार सचिव अमोल राठोड, आगार प्रतिनिधी महेश बुरुंगले, दीपक चिकटे, प्रफुल चव्हाण, सुरेश लामगे, योगेश मोडोकार शेख राजिक, श्रीकृष्ण शिरसाट,, मोहन रहाटे, सुभाष बहाकर मोहन जुमले, प्रकाश परिहार वासुदेव डाबेराव, शांताराम पांग, पुरुषोत्तम वावरे, मोहन निचळ, अनिल इंदोरे, संदीप पटोकार, महिला प्रतिनिधी शितल कोगदे, विद्या गिरी आरती केनेकर, सत्यभामा सदार रूपाली ताथोड, दर्शना भावरकर महानंदा धनोकार इतर कामगार संघटनेचे सभासद निदर्शन आंदोलनात सहभागी झाले होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button