ओबीसींचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीचा काँग्रेसचा भाजपा तर्फे निषेध*

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा ता.प्रतिनिधी विजय घोडे✍️ तेल्हारा तालुका व शहर भाजपा तर्फे दि 25 मार्च रोजी तेल्हारा येथील अग्रसेन टावर चौकात शहर भाजपा अध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ताच्यां उपस्थितीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केल्याप्रकरणी जाहीर निषेध करण्यात आला.मोदी आडनावावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टिप्पणी करून तेली समाजाचा आणि एकणच ओबीसींच्या अपमान केला होता. त्याचे विरोधात 2019 साली दाखल फौजदारी मानहानीच्या खटल्यात मा.सुरत न्यायालयाने गुरुवार दि 23 मार्च रोजी राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे या स्पर्शभूमीवर राज्यव्यापी निषेध आंदोलना अंतर्गत तेल्हाऱ्यात राहुल गांधी व काँग्रेस पक्षांचा जाहीर निषेध करण्यात केला. भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात “मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद ” “राहुल गांधी हाय हाय ” अशा स्वरुपाची नारेबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला, यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहने,ज्येष्ठ नेते गजानन नळकांडे,रवि गाडोदिया,अतुल विखे,गणेश इंगोले,बालु पवार,ऋषिकेश चोपडे,सुनिल भुजबुले,विजय देशमुख,राजेश टोहरे,राहुल झापर्डे,सतीश चहाजगुणे,श्यामल देशमुख,कैलास भटकर, नागोराव वानखडे,रवि शर्मा,नारायण गोयल,राजु वडतकार,गोकुळ हिंगणकार इत्यादी उपस्थित होते.



