बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

रिपाइं आठवले गटाकडून आमदार श्वेताताई महाले पाटील, विद्याधर महाले व विकास गायकवाड यांचा भव्य सत्कार

सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; जनहितासाठी सर्वतोपरी प्रयत्नांचे आश्वासन

बुलढाणा (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय विकासाभिमुख आमदार श्वेताताई महाले पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव तथा बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र विद्याधरजी महाले आणि मंत्रालयीन कक्षाधिकारी विकासजी गायकवाड यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.

हा सत्कार सोहळा बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, जिल्हा महिला अध्यक्षा वंदनाताई वाघ, कार्याध्यक्ष प्रा. मुक्तार पठाण, जिल्हा युवा अध्यक्ष प्रकाश पाटील म्हस्के तसेच ज्येष्ठ समाजाभूषण नेते प्रा. इंजि. भैय्यासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी मान्यवरांना पुष्पगुच्छ व ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी उपस्थित रिपाइं पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा परिचय करून देत सामाजिक, धार्मिक आणि राजकीय विषयांवर सविस्तर भूमिका मांडली. यावर आमदार श्वेताताई महाले पाटील, विद्याधरजी महाले आणि विकासजी गायकवाड यांनी सकारात्मक चर्चा करत जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी मराठा महासंघाचे नेते रामभाऊ शिंदे, चिखली तालुकाध्यक्ष हिम्मतराव जाधव, बुलढाणा तालुकाध्यक्ष केशवराव सरकटे, समाजसेवक सुरेंद्र जाधव, युवानेते विशाल गवई, कीर्तनकार उमरसिंग सुरडकर, विदर्भ उपाध्यक्षा आशाताई वानखेडे, इंजि. राजेश सरकटे, इंजि. भास्करराव जाधव, बाळासाहेब आहीरे, राणा मोरे, फोजी राहुल आवसरमोल, पॅंथर नेते मुरलीधर गवई, दिलीतमित्र विजयराज सपकाळ, भानुदास शेजूळ, पत्रकार विजय भालमोडे, रमेश पिंपळे, आकाशभैया साळवे, सुधीरदादा हिवाळे, प्रदीप मुखदयाल, भाऊसाहेब वानखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button