खानदेशजळगावजळगावा जिल्हामहाराष्ट्र

५० वर्षे जुनी इमारत जीर्णावस्थेत; दुर्घटनेचा धोका टाळण्यासाठी तातडीने नूतनीकरणाची मागणी

सावदा | प्रतिनिधी (मुख्तार शेख)

सावदा नगरपालिकेच्या हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रमा बाई बुद्ध विहाराच्या नूतनीकरणासाठी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन मंगळवारी (दि. १ जुलै २०२६) नगरसेवक विशाल तायडे यांच्या पुढाकाराने नगरपालिका प्रशासनाला देण्यात आले.

बौद्ध धर्म पंच ट्रस्ट, सावदा यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात, सिटी सर्व्हे क्रमांक २३५६ मधील रमा बाई बुद्ध विहाराची इमारत गेल्या सुमारे ५० वर्षांपासून अस्तित्वात असून ती सध्या अत्यंत जीर्णावस्थेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. इमारतीच्या भिंती व छत कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने समाजबांधवांनी तेथे सभा, बैठका व धार्मिक कार्यक्रम घेणेही बंद केले आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने नूतनीकरण करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नगरसेवक विशाल तायडे यांनी संबंधित बौद्ध धर्म पंच ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नगरसेविका सीमा वेडू लोखंडे व नगरसेविका संगीता संजय तायडे यांच्या उपस्थितीत हा विषय नगरपालिकेसमोर मांडला. त्यानंतर नगरपालिका मुख्याधिकारी भुषण वर्मा तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा रेणुका पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनावर देविदास सिताराम लोखंडे, सिद्धार्थ किटकुल बडगे, बाबुराव गोंडू तायडे, सुखदेव हिरामण तायडे, भिमराव हिरामण सपकाळे, अशोक गंभीर बडगे, सतीश मधुकर लोखंडे, बबन बालू बडगे, प्रकाश देवचंद तायडे आणि भिमराव गरबड लोखंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

रमा बाई बुद्ध विहाराच्या नूतनीकरणासाठी दलित वस्ती सुधार योजनेतून तातडीने निधी मंजूर करून कामाला सुरुवात करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button