रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन

रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन
जळगाव – रमाई आंबेडकर जयंती निमित्ताने संभाजी नगरातील झाकीर हुसेन कॉलनीत उद्या दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता अभिवादन सभा व शालेय विद्यार्थ्यांसाठी रमाई आंबेडकर यांच्या जिवनसंघर्षावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे . या कार्यक्रमास महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे प्रामुख्याने मार्गदर्शन करणार असुन डॉ. मिलिंद बागुल , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे , डॉ. सत्यजित साळवे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहेत . चंद्रभागाबाई सपकाळे यांच्या स्मरणार्थ मुकुंद सपकाळे यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 1100 रुपये , द्वितीय बक्षीस 750 रुपये , तृतीय बक्षीस 500 रुपये देण्यात येणार आहे . तरी या उपक्रमात मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन साची महिला मंडळाच्या अध्यक्षा सुजाता इंगळे , कुसुम सोनवणे , माया मोरे , भारती सपकाळे , पचशीला तायडे , रेखा भालेराव , रेखा केदारे, छाया भालेराव यांनी केलेले आहे .




