महाराष्ट्रविदर्भ

महावितरणची कंबरतोड प्रस्तावित दरवाढ

**स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

अकोला प्रतिनिधी

मुकेश संतोष हातोलेमहावितरणने २०२३-२४ साठी *३७% वीज* दरवाढीचा कंबरतोड प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे ज्यामुळे आजच देशातील सर्वात जास्त दर असणार्या महाराष्ट्रातील ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे. दरमहा दीडशे ते तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणार्या घरगुती ग्राहकांना ४०० ते ८०० रुपयांपर्यंत अतिरिक्त झटका बसणार आहे तर ३०० युनिट पेक्षा जास्त वीज वापर असणार्या घरगुती ग्राहकांना ८०० ते १७०० रुपयांपर्यंत दरवाढ सोसावी लागणार आहे. व्यापारी , छोटे उद्योजक यांनाही मोठी झळ बसणार आहे तर मोठ्या उद्योगांनाही जवळपास ३० % दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. यातून नवीन उद्योग महाराष्ट्रात येणं तर सोडाच आहेत तेही महाराष्ट्रातून पळ काढण्याची भिती आहे. व्यापारी व औद्योगिक दरवाढीचा अंतिम भार सामान्य माणसालाच झेलावा लागत असल्याने आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य माणसाचे कंबरडे मोडणार आहे.

*नागरीकांना आमचे आवाहन आहे की या प्रस्तावित दरवाढीला ऑन लाईन पध्दतीने १५ फेब्रुवारी पर्यंत www.merc.gov.in/e-public-consultation या संकेतस्थळावर हरकती नोंदवता येणार आहेत त्याचा उपयोग करुन मोठ्या संख्येने या हरकती नोंदवाव्यात.*

*अधिक माहितीसाठी संपर्क साधावा…*

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button