ग्रामसेवकाने कंटाळवून लावले गाव सरपंचासह गावातील कोणत्याच नागरिकांचा उचलत नाही फोन


*ग्रामसेवकाने कंटाळवून लावले गाव।*
*सरपंचासह गावातील कोणत्याच नागरिकांचा उचलत नाही फोन।*
*शेगांव (प्रतिनिधी)*
स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे
शेगाव तालुक्यांतर्गत येत असलेल्या ग्राम मनसगाव येथील ग्रामसेवक संजय दांदळे हे गेल्या 10 ते 11 महिन्यापासून ग्रामपंचायत मनसगावला ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत.गेल्या काही दिवसापूर्वी त्यांचे प्रमोशन होऊन माटरगाव येथे त्यांची बदली झालेली आहे.परंतु त्यांनी अद्यापही दुसऱ्या ग्रामसेवकाला चार्ज दिला नाही. सरपंच उपसरपंच व सदस्यांनी त्यांना गेल्या महिन्याभरात २०० ते ३०० कॉल केले.परंतु त्यांनी एकही कॉल उचलला नाही. त्यामुळे गावात ग्रामसेवक नसल्याने गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.गावात मासिक मीटिंग सुद्धा नाही ग्रामसेवकाकडे असलेले शासन परिपत्रक हे सुद्धा सरपंच सदस्यांना माहीत नाहीत.मासिक मीटिंग बद्दल ग्रामसेवक फोन उचलत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. ह्या ग्रामसेवकाने पंधरावा वित्त आयोगातील एकही काम केले नाही. तसेच मनसगाव ग्रामपंचायत मुख्यालयात फक्त मासिक मिटींगलाच येत होते.गाव अनेक समस्यांच्या जाळ्यात असून सुद्धा ग्रामसेवक आपल्या मनमानी पणाने वागतो या अगोदर सुद्धा त्यांच्या अनेक तक्रारी होत्या तरी अशा ग्रामसेवकाची पदोन्नती होते याला कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे हा ग्रामसेवक हुकूमशाही प्रमाणे वागतो ग्रामसेवकाला सरपंच व सदस्यांनी गाव विकास कामे आणि गावातील समस्या बाबत चर्चा करण्यासाठी तसेच नवीन ग्रामसेवकाला चार्ज देणे संदर्भात ग्रामसेवकाला 200 ते 300 फोन केले परंतु या महाशयांनी अजून सुद्धा फोन उचललेला नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतचे सचिव म्हणून ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी हे काम पाहतात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7 नुसार ग्रामसेवकाला गाव विकासाच्या दृष्टीने विकास कामाचे नियोजन ,ग्रामपंचायत चा निधी, ग्रामसभा अहवाल, ठरावांच्या अमलबजावणी ,पत्रव्यवहार , शासकीय योजनांचे व्यवस्थापन इत्यादी अनेक कामावर जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडावे लागतात.परंतु या महाशयांनी वरिष्ठांच्या पाठबळामुळे आपल्या कर्तव्यात पायमल्ली करत असल्याच्या गावकऱ्याचा आरोप आहे.ग्रामसेवक संजय दांदळे हे गेल्या आठ नऊ महिन्यापासून गावामध्ये फक्त मासिक मिटींगलाच येत होते. त्यांनी पंधरावे वित्त आयोगातील आतापर्यंत कोणतेच काम केले नाही गावविकास कामे गावातील अडचणी याकडे त्यांचे स्पष्ट दुर्लक्ष होते ते सरपंच उपसरपंचाचे फोन उचलत नसल्याने, त्यांची बदली झाल्यापासून त्यांनी अजूनही ग्रामपंचायत मध्ये पाऊल टाकले नाही.तसेच ते कोणाचा फोनही उचलत नाही.त्यांनी चार्ज न दिल्यामुळे आम्हा ग्रामपंचायतला आणि गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। मनसगाव ग्रामपंचायतला त्वरित ग्रामसेवक न मिळाल्यास आणि ग्रामसेवक संजय दांदळे यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने पंचायत समिती शेगाव येथे तीव्र आंदोलन करणार”अशी माहिती सरपंच विद्या कंकाळ उपसरपंच स्वाती लांजुळंकार यांनी दिली.



